शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यातच होणार ‘कोरोना’ची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 10:49 IST

‘व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोसीस लॅब’चे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

अकोला : कोरोना संशयितांचे वैद्यकीय नमुने आता अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच तपासले जाणार आहेत. त्यासाठी १५ दिवसांत प्रस्तावित ‘व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोसीस लॅब’चे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासन तथा आरोग्य विभागाला दिले.सध्यातरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह आढळला नाही; परंतु आगामी काळात कोरोनाचा धोका पाहता पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा प्रशासन तथा आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी ‘कोरोना’ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन त्यांनी आरोग्य विभागाला दिले, तसेच येथे प्रस्तावित ‘व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोसीस लॅब’ची माहिती त्यांनी घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे लॅबचे निर्माण कार्य प्रलंबित असल्याची माहिती मिळताच कडू यांनी १५ दिवसांत काम पूर्ण करून लॅब सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यांची चाचणी अकोल्यातच होणे शक्य होणार आहे. त्यामुळे विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात होणारी ही दुसरी लॅब आहे.‘स्वाइन फ्लू’साठी होती लॅब प्रस्तावित!जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता २०१७ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ‘व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोसीस लॅब’साठी प्रयत्न केले होते. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेंतर्गत (एनआयव्ही) लॅबला मान्यता मिळाली होती. त्यासाठी जागाही निश्चित केली होती. शिवाय, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे येथील दहा जणांच्या एका पथकाला प्रशिक्षणही दिले होते.कोरोनाच्या निमित्ताने प्रशासनाला जाग!तत्कालीन अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांची पुण्याला बदली झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘व्हीआरडी’ लॅबकडे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी लॅबसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली होती; परंतु लॅबसाठी आवश्यक बांधकाम पूर्ण न केल्याने वैद्यकीय साहित्य बाहेरच पडून होते. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशनच झालेले नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय