शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 CoronaVirus : दिल्लीहून येणाऱ्या नागरिकांना व्हावे लागेल ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:43 IST

‘आयसोलेशन’ कक्षात अथवा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असला तरी त्यांना शोधून ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’मध्ये ठेवण्याचे निर्देश मनपाला प्राप्त झाले आहेत.

- आशिष गावंडेअकोला: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर सतर्क झालेल्या राज्य शासनाने शहरी भाग असो वा ग्रामीण भागात दिल्ली येथून दाखल झालेल्या व्यक्तींवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश पोलीस व जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला जारी केले आहेत. संबंधित नागरिकांनी ‘आयसोलेशन’ कक्षात अथवा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असला तरी त्यांना शोधून ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’मध्ये ठेवण्याचे निर्देश मनपाला प्राप्त झाले आहेत. त्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने क्षेत्रीय स्तरावर चार पथकांचे गठन केले आहे.गत काही दिवसांत देशात व महाराष्ट्रात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ व संदिग्ध व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांना गर्दी न करण्याचे तसेच एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे वारंवार आवाहन केले जात असले तरी नागरिक या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यादरम्यान, दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर राज्य शासन कमालीचे सतर्क झाले आहे. राज्यातील शहरी भाग असो व ग्रामीण भागात दिल्ली येथे विविध कामकाजानिमित्त गेलेल्या व परत आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्याचे पोलीस यंत्रणा, आरोग्य, जिल्हा व मनपा प्रशासनाला निर्देश प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय राखत संबंधित नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’ करण्याची सूचना प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर चार विविध पथकांचे गठन केले आहे.

१२ जणांचा घेतला शोधदिल्ली येथे विविध कामनिमित्त गेलेल्या व ‘लॉकडाऊन’नंतर शहरात दाखल झालेल्या नागरिकांची ‘हिस्ट्री’ तपासण्याचे काम मनपाच्या स्तरावर केले जात आहे. १ एप्रिलपासून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने १२ जणांचा शोध घेतला असून, त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’ होण्याचे निर्देश दिले आहेत.

...तरीही उपचार घ्यावेच लागतील!दिल्ली येथून शहरात दाखल झालेल्या व्यक्तींनी यापूर्वी रुग्णालयात तपासणी केली असेल किंवा १४ दिवसांचा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असेल, तरीही त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’अंतर्गत पुढील १४ दिवस देखरेखीखाली ठेवल्या जाणार आहे. यादरम्यान, संबंधित संदिग्ध नागरिकांनी नकार दिल्यास त्यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका