शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅबची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 08:57 IST

अकोल्यासह राज्यातील नागपूर जीएमसी आणि मिरज येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबची आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसहा नवीन ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली होती.औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील लॅब सुरू करण्यात आल्यात. ‘लॉकडाऊन’मुळे वाहतुकीचीही मोठी अडचण असल्याचे बोलल्या जात आहे.

प्रवीण खेतेअकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्यात सहा नवीन ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली होती. त्यानुसार, लॅब उभारणीच्या कामाला वेगही आला; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे लॅबसाठी आवश्यक उपकरणे आणि रसायने उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे अकोल्यासह राज्यातील नागपूर जीएमसी आणि मिरज येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबची आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य सरकारने राज्यात औरंगाबाद, धुळे, सोलापूर, नागपूर जीएमसी, मिरज आणि अकोला या सहा ठिकाणी नव्याने ‘व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोसिस लॅब’ला मान्यता दिली होती. लॅब उभारणीचे कामही वेगाने करण्यात आले. आठवडाभरातच यातील औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील लॅब सुरू करण्यात आल्यात; मात्र उर्वरित तिन्ही ठिकाणी ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आहे. लॅबसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच रसायने पुरविण्यासाठी पुरवठादारच उपलब्ध होत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. जवळपास ३० ते ३५ प्रकारची रसायने असून, ही एका ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय, ‘लॉकडाऊन’मुळे वाहतुकीचीही मोठी अडचण असल्याचे बोलल्या जात आहे. वेळेत पुरवठादार न मिळाल्यास तिन्ही ठिकाणी लॅबची प्रतीक्षा

नागपूरचा सप्लाय बंद!नागपूरस्थित ‘आयजीएमसी’तील ‘व्हीआरडीएल’ लॅबकडून अकोल्यासाठी आवश्यक रसायनांचा पुरवठा होणार होता; मात्र येथील पुरवठा बंद झाल्याने दिल्ली, बंगळुरू, हिमाचल प्रदेश या ठिकाणी रसायनांसाठी संपर्क साधावा लागत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली; मात्र पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने व उपकरणे मिळण्याची शक्यता असून, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वाहन पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या कंपनीमार्फत आवश्यक रसायने मिळाल्यानंतरलॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तरच मिळणार टेस्टिंग करण्याची परवानगी!वैद्यकीय उपकरणे व रसायने उपलब्ध झाल्यानंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह मिरज आणि नागपूर जीएमसीला ‘आयसीएमआर’कडे तयारीची मागणी करावी लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) किटची मागणी करावी लागले. या किटच्या आधारे कोरोनाच्या संशयित रुग्णाचे नमुने तपासून त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येईल. या परीक्षेत पास झाल्यावर ‘एनआयव्ही’ टेस्टिंगसाठी तिन्ही लॅबला परवानगी देईल.अद्यापही ‘बायोसेफ्टिक कॅबिनेट’चा पुरवठा नाही व्हीआरडीएल लॅबसाठी ३ लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य खरेदी ही हाफकीनमार्फत केली जात आहे. त्यानुसार, अकोला जीएमसीने ‘बायोसेफ्टिक कॅबिनेट’सह इतर उपकरणांची हाफकीनकडे मागणी केली होती; परंतु हाफकीनकडून अद्यापही ही उपकरणे पुरविण्यात आली नाहीत.

लॅब उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. लॅबसाठी आवश्यक उपकरणे व रसायने मिळविण्याचे काम सुरू असून, लवकरच लॅब सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. नितीन अंभोरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय