शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
2
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
3
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
4
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
5
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
6
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
7
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
8
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
9
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
10
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
11
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
12
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
13
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
14
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
16
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
17
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
18
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
19
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
20
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Coronavirus : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह, ६१ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 20:09 IST

फतेहचौक भागातील वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अकोला : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर बैदपूरा येथील फतेह चौक भागातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा पॉझिटीव्ह अहवाल आला आहे.

दरम्यान बैदपूरा येथील तीन रुग्णांना पुर्ण बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६८२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६४८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६२० अहवाल निगेटीव्ह २८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३४ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६८२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३४, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५०० तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६२० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८ आहेत. आज प्राप्त झालेल्या ३१ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आता सद्यस्थितीत २८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील तिघे जण मयत आहेत. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व आज (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १४ जण उपचार घेत आहेत.

नवा रुग्णही बैदपुऱ्यातीलच

दरम्यान आज ज्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तो ६० वर्षीय व्यक्ती असून तो हि बैदपूरा भागातील फतेह चौक येथील रहिवासी आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान आजअखेर ६७५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३१८ गृहअलगीकरणात व ८४ संस्थागत अलगीकरणात असे ४०२ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

बैदपुऱ्यातील तिघांना दिला डिस्जार्ज

आज सायंकाळी तिघा रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. हे तिघे रुग्ण बैदपूऱ्यातील असून त्यातील एक रुग्ण हा जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला होता. हा रुग्ण ६० वर्षे वयाचा इसम असून दि. ५ रोजी दाखल झाला होता. त्याचेवरउपचार करण्यात आले. या दरम्यान त्याचेवर सहा वेळा चाचण्या करण्यात आल्या. त्यातील चौथा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. नंतरचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यात एका ७५ वर्षिय वृद्धेचा व एका पाच वर्षिय बालिकेचा समावेश आहे. हे दोघेही या पहिल्याच रुग्णाच्या संपर्कातून दि.७ रोजी दाखल झाले होते. त्यांच्याही सहा चाचण्या या दरम्यान झाल्या. चवथा अहवाल पॉझिटीव्ह आला नंतर पुन्हा पाचवा व सहावा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.

पालकमंत्र्यांची उपस्थिती

या रुग्णांना डिस्चार्ज देते वेळी स्वतः पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचीही उपस्थिती होती. समवेत आ. रणधीर सावरकर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार यांच्यासह उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला