शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 09:57 IST

जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केली.

- सचिन राऊत

अकोला : वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या आरक्षित जंगलांमधून परप्रांतीय तसेच अनेकांची भटकंती होण्याचा धोका लक्षात घेता वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये मुक्त संचार करीत असलेल्या वन्य प्राण्यांना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूंचा धोका असल्याचे वन विभागाच्या लक्षात येताच वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानंतर आता अनेक परप्रांतीय तसेच राज्यातील अंतर्गत गावांमध्ये पायी जाणाºयांनी काही जंगलांचा वापर सुरू केल्याचे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जंगलात असलेल्या गावात कोरोनाचा शिरकाव होण्यास ब्रेक लावण्याचे काम वन विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी तातडीने पावले उचलीत आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांना या संसर्गजन्य विषाणूपासून वाचविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याच आधारे आरक्षित जंगलांमध्ये असलेल्या राज्य नाक्यांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश असलेले पथकच बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात अलर्टचे कामकाज करीत आहेत. एमपी, तेलंगना आंध्रप्रदेशच्या सीमाराज्याला लागून मध्यप्रदेश, तेलंगना आंधप्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या सीमा असून, त्याला लागूनच मोठमोठी जंगले आहेत. या जंगलांमधूनच आता अनेकांनी प्रवास सुरू केल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वन विभागाच्या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या वन विभागाच्या अधिकाºयांकडून करण्यात येत आहे. हरिसाल तसेच बैतुल या मार्गे मोठी जंगलं असल्याने मध्यप्रदेशातून येणारे अकोटमध्ये प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. जंगलातील रहिवाश्यांना क ोरोनाचा धोका कमीराज्यातील वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये आजही अनेक गावे आहेत. या गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचली नसली तरी कोरोना पोहोचण्याचा धोका होता; मात्र आता वन विभागाच्या अधिकाºयांनी जंगलात बंदोबस्त लावत नाक्यांवर अलर्ट जारी केल्याने या गावातील रहिवाश्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती आहे; मात्र स्थलांतरामुळे या रहिवाशांना धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेताच उपाययोजना सुरू केल्याने जंगलातील रहिवासी पुन्हा सेफ झोनमध्ये आले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याforest departmentवनविभाग