शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:53 IST

सोमवार, ८ जून रोजी दिवसभरात आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १०६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ९८ निगेटिव्ह आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सोमवार, ८ जून रोजी दिवसभरात आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. तर एकूण रुग्णसंख्याही ८२१ झाली आहे. दरम्यान, आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या २३७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. रविवार, ७ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८१३ होता. त्यामध्ये सोमवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८२१ वर पोहचला आहे. सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १०६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ९८ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात एक महिला व सात पुरुष पॉझिटिव्ह आहेत. त्यातील दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित बलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.दोघांचा मृत्यूसोमवारी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एक जण नायगाव येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्याला तीन जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारी हैदरपूरा खदान येथील ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेस दोन जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आणखी पाच जणांना डिस्चार्जआज दुपारी आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात एक महिला व अन्य चार पुरुष रूग्ण आहेत. त्यातील दोन जणांना घरी तर उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघे जण सिटी कोतवाली परिसरातील तर अन्य देशमुख फैल व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

२३७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत ८२१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३९ जण (एक आत्महत्या व ३८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज पाच जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५४५  झाली आहे. तर सद्यस्थितीत २३७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला