शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने बिघडली अकोल्याची स्थिती - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:15 IST

आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत आहे. केवळ एक घटक या परिस्थितीला सावरू शकत नाही, सर्वांचे सहकार्य व समन्वय या माध्यमातूनच कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकता येईल. दुर्दैवाने अकोल्यात प्रशासनामध्ये नसलेल्या समन्वयामुळे स्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप करत आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.केंद्र शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्य अहवाल देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महानगरांमध्ये होत आहे. अकोलाही त्याला अपवाद नाही. अकोल्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक असून, राज्य शासन व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच येथील स्थिती बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोल्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचा सर्वाधिक ताण हा शाासकीय महाविद्यालयावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे सुपर स्पेशालिटीची इमारत बांधून तयार आहे. येथे आवश्यक ती पदभरती करून हे हॉस्पिटल सुरू केले असते तर आताच्या परिस्थतीत रुग्णांसाठी त्याचा मोठा लाभ झाला असता; मात्र वेळावेळी पाठपुरावा करूनही राज्य शासनाने या हॉस्पिटलबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या आघाडीवर राज्य शासनाची कामगिरी ही ‘उत्तम’ आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. प्रशासन व शासन यांच्यामध्ये समन्वय हवाच; मात्र नागरिकांनीही अलगीकरणाची प्रक्रिया गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत पुढील दिवसांमध्ये आता स्वत: कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजना व नियोजनावर लक्ष ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याSanjay Dhotreसंजय धोत्रे