शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एक बळी ; ९ पॉझिटिव्ह, २१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 17:57 IST

मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८८ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर नऊ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८८ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेले तीघेही पुरुष आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन जण कापशी रोड अकोला येथील, तर एक जण पातूर येथील एकाचा समावेश आहे. सायंकाळी एक महिला व पाच पुरुष असे सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये बाभूळगाव येथील दोन जण, तर बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५४ वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, मंगळवारी सकाळी आणखी एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला अकोट तालुक्यातील कावसा येथील असून, त्यांना ८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.२१ जणांना डिस्चार्जमंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून तीन जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून चार जणांना अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५४ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या