शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ३७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:14 IST

आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही या संसर्गजन्य आजाराचा हैदोस सुरूच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवार, २० जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०५ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या २,१७२ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे रुग्ण अकोल्यातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वॉर्टर, खेतान नगर व जीएमसी येथील आहेत.

अकोला शहरातील दोघांचा मृत्यूरविवारी रात्री अकोला शहरातील दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी एक ६० वर्षीय पुरुष गुलजारपुरा भागातील असून, दुसरा ६६ वर्षीय पुरुष लक्ष्मीनगर भागातील आहे. या दोघांनाही ११ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.२५ जणांना डिस्चार्जसोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर येथून १४, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून एक अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३१४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरूआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१७२ असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३१४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या