शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १५६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:50 IST

मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अकोला : एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत धिम्या गतीने असलेल्या कोरोना संसर्गाने मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ‘गिअर’ बदलला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवार, ११ मे रोजी यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, हे रुग्ण मोठी उमरी व जुने शहरातील किल्ला चौक परिसरतील आहेत. मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आजच्या दोन रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन ती १५६ झाली आहे. सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी यामध्ये आणखी दोघांची भर पडत एकूण रुग्णसंख्या १५६ वर पोहचलजे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजाराने झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. सोमवारी एकूण ४३ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ४१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५६मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला