शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू: ५३ नवे ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 10:44 IST

शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही खु. व अकोट येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरूच असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची व नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही खु. व अकोट येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३, तर रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये २० असे एकूण ५३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १00 झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,३५४ झाली आहे. दरम्यान, ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मध्यवर्ती कारागृहातील १५ जणांसह, रामदासपेठ येथील तीन, महान येथील तीन जण, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, अडगाव बु., कुटासा, जुने शहर, खदान, वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५० जणांना डिस्चार्जशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रिजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३४९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रॅपिड टेस्ट: ६०८ चाचण्या; २० पॉझिटिव्ह

रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट मोहिमेंतर्गत दिवसभरात झालेल्या ६०८ चाचण्यांमध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अकोला ग्रामीण भागात ९१ चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे १०८ चाचण्या झाल्या. त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे १४३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बार्शीटाकळी येथे सात जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पातूर येथे १०४ चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तेल्हारा येथे ५५ चाचण्या झाल्या. त्यापैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मूर्तिजापूर येथे ३२ चाचण्या झाल्या. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अकोला मनपा हद्दीत ४४ चाचण्या झाल्या व सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अकोला जिल्ह्यातील १५ आरोग्य कर्मचाºयांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण ६०८ चाचण्या होऊन त्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४,८३० चाचण्या झाल्या असून, २४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या