शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू, २० पॉझिटिव्ह, ४८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 18:24 IST

रविवार, १२ जुलै रोजी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याची चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, १२ जुलै रोजी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ९४ झाली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १८७९ वर गेली. दरम्यान, रविवारी तब्बल ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात १३८ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून, दोन जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही अहवाल आला नाही.

पुरुष व महिलेचा मृत्यूशहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे. तर अकोट येथील ६० वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला २५जून रोजी दाखल झाली होती.४८ जणांना डिस्चार्जरविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, कोविड केअर सेंटर मधून ३०, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच, ओझोन हॉस्पिटल मधून चार व हॉटेल रिजेन्सी येथून पाच अशा एकूण ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत २७३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८५८+२१= १८७९मयत-९४(९३+१)डिस्चार्ज- १५१२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २७३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला