शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; ८८ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:12 IST

कोरोनाबळींचा आकडा १७१ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९२३ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ८८ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोनाबळींचा आकडा १७१ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९२३ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८८ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ३२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ , जीएमसी येथील सात, कट्यार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील प्रत्येकी चार, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळी, पळसोबढे, खेडा, गीता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीेनगर, मुर्तिजापूर व बेलूरा (खु.) येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.तिघांचा मृत्यूदरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ८४ वर्षीय पुरुष व बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष या तिघांचा बुधवारी मृत्यू झाला. या तिघांना अनुक्रमे ६ सप्टेंबर, ३ सप्टेंबर व ३१ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.११२४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३६२८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११२४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला