CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; ८८ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 04:12 PM2020-09-09T16:12:11+5:302020-09-09T16:12:20+5:30

कोरोनाबळींचा आकडा १७१ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९२३ झाली आहे.

CoronaVirus in Akola: Three more die; 88 new positives | CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; ८८ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; ८८ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ८८ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोनाबळींचा आकडा १७१ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९२३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८८ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ३२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ , जीएमसी येथील सात, कट्यार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील प्रत्येकी चार, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळी, पळसोबढे, खेडा, गीता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीेनगर, मुर्तिजापूर व बेलूरा (खु.) येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ८४ वर्षीय पुरुष व बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष या तिघांचा बुधवारी मृत्यू झाला. या तिघांना अनुक्रमे ६ सप्टेंबर, ३ सप्टेंबर व ३१ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

११२४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३६२८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११२४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: CoronaVirus in Akola: Three more die; 88 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.