शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

 CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:21 IST

सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे.

ठळक मुद्देदक्षिण झोन अंतर्गत येणाºया सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णांची भर पडली.शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ झाली.

अकोला: शहराच्या दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ मधील सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठच्या घरात पोहोचली आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून, या भागातील स्थानिक रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मनपाचे कर वसुली लिपिक, शिक्षक व आशा वर्कर यांच्या २० पथकांचे गठन करण्यात आले आहे.संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. ७ एप्रिल रोजी उत्तर झोन अंतर्गत येणाºया प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी अकोट फैल परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. त्यानंतर बैदपुरा येथील कोरोनाबाधित इसमाच्या कुटुंबातील आणखी तीन लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक दोनचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. यादरम्यान पुन्हा प्रभाग क्रमांक ११ मधील ताजनापेठ परिसरात एका ४५ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर संबंधित मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबातील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एकूणच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली होती. त्यामध्ये रविवारी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णांची भर पडली.

या परिसरात केली नाकाबंदीमहापालिका आयुक्त तसेच नगररचना विभागातील सहायक नगररचनाकार व दक्षिण झोनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे यांनी सिंधी कॅम्प परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी नकाशा तयार केल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षता नगर चौक ते झुलेलाल पाणपोई ते पाटील दूध डेअरी तेथून गादी कारखाना, पक्की खोली परिसर, पेन्शनपुरा, कैलास टेकडी परिसर, मनपा हिंदी-सिंधी मुलांची शाळा क्रमांक १४ चा परिसर तसेच नवीन पोलीस वसाहत आदी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका