शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी सात पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३६२ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:14 IST

सात जणांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या आता ३६२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देसात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

अकोला : अकोला शहरात कोरोना संसर्गाची घोडदौड कायमच असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक संक्रमित होत आहेत. शनिवार, २३ मे रोजी कोरोनाबाधितांच्या आकड्यात सात जणांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या आता ३६२ वर पोहचली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत १२८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.पहिला रुग्ण ६ एप्रिल रोजी सापडल्यानंतर संपूर्ण एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदच होता. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत असून, दिवसागणिक दुहेरी आकड्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५५ होती. यामध्ये शनिवारी आणखी सात जणांची भर पडत हा आकडा ३६२ वर पोहचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी एकूण ३७ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये सहा महिला, तर एका पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे एकट्या फिरदौस कॉलनी भागातील आहेत. तर उर्वरित दोघे हे अनुक्रमणे मानिक टॉकीज जवळ-टिळकरोड व खोलेश्वर भागातील लोहिया नगर येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे झाला आहे. तर बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत तब्बल २११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १२८ पॉझिटिव्ह रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.आणखी पाच जण कोरोनामुक्तएकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी रात्री आणखी पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील, तर उर्वरित तीघे हे अनुक्रमे फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.प्राप्त अहवाल- ३७पॉझिटीव्ह-  ०७निगेटीव्ह- ३०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३६२मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२११दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला