शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:23 IST

अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोनामुक्तीचा दर हा अवघा ५४ टक्के आहे.मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अकोला शहरासह आता कोरोनाचे संक्रमण हे ग्रामीण भागातही पोहोचले असल्याने रुग्णवाढीचा वेग कायमच आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात १ हजार ७७९ रुग्ण आहेत. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असला तरी अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. विशेष म्हणजे राज्यातील कोरोनामुक्तीचा दर हा अवघा ५४ टक्के आहे. ही काही प्रमाणात दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये आता ऋतू बदलामुळेही अनेकांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. या लक्षणांमुळे घाबरून न जाता आपल्या फॅमिली किंवा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरजेनुसार तपासणी करून घ्या; मात्र सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी सौम्य लक्षणांबाबत तपासणी किंवा संशय असल्यास रीतसर वैद्यकीय चाचणी करवून घेतल्यास कोरोनाचे वेळेत निदान होण्यास मदत होईल. कोरोनाचा संसर्ग झाला, तरी वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण वेळेत बरा होऊ शकतो; मात्र साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन डॉ.सिरसाम यांनी केले आहे.

कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत; परंतु ज्यांना लक्षणे आढळून आली. सोबत त्यांना दुर्धर आजारही आहेत, अशा रुग्णांनी दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घ्यावा. योग्य वेळेत उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होऊ शकतात. जिल्ह्यातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला