शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

Coronavirus in akola: दिवसभरात एकाचा मृत्यू; ३० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:53 IST

अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना ने हैदोस घातला असून गुरुवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहा दिवसांपासून मृत्यूचे हे सत्र सुरूच असून या कालावधीत नऊ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९१४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतच असून अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढिच सत्र ७ एप्रिल पासुन सुरु झालं ते अद्यापही थांबले नाही. मे महिन्यात पॉझिटिव रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. सरासरी पाच ते सहा दिवसातच पॉझिटिव रुग्णांनी शंभरी गाठत ९१४ चा आकडा पार केला. धक्कादायक बाब म्हणजे दर दिवसाआड एकाचा बळी गेला असून, मागील सहा दिवसात दररोज एकाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मृत्यूचे हे सत्र सुरूच असून गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत झालेला रूग्ण हा ७६ वर्षीय पुरुष असून हरिहरपेठ परिसरातील रहिवासी आहे. हा रुग्ण ३ जून रोजी दाखल झाला होता. बुधवार १० जून रोजी रात्री उपचार घेतांना त्या रुग्णाचा मृत्यु झाला. यासोबतच गुरुवारी आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तर सायंकाळी प्राप्त अहवालानुसार मोहता मील रोड आणि जुने शहर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१४ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही ४३ झाला आहे. सद्यस्थितीत २९४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.१०८ अहवाल निगेटिव्ह बुधवारी दिवसभरात प्राप्त १३८ अहवाला पैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत .तर १०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .अशी आहे स्थिती एकूण पॉझिटिव्ह - ९१४मृत्यू - ४३डिस्चार्ज - ५७७अ‍ॅक्टिव्ह रुग्ण - २९४
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या