शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; एक पॉझिटिव्ह, ६१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 18:46 IST

गत २४ तासात तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्याने सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रकोप सुरुच असून, मंगळवार, २३ जून रोजी बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अकोला शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ६७ वर गेला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४४ झाली आहे. दरम्यान, गत २४ तासात तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्याने सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात एकूण ११० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोल्यातील दगडी पूल भागातील एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.दरम्यान, बाळापूर शहरातील एका ५० वर्षीय महिलेचा मंगळवारी पहाटे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदर महिलेला १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे आतापर्यंत एकूण ६७ मृत्यू झाल्याची नोंद आहे.६१ जणांना डिस्चार्जसोमवार व मंगळवारी तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला.मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयातून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील लक्ष्मी नगर व तारफैल येथील प्रत्येकी तीन, दोघे विजय नगर येथील तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, डाबकीरोड, चांदुर, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर कोविड केअर सेंटर येथून सोमवार व मंगळवार मिळून ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात वाडेगाव येथील १३, अकोट फैल येथील आठ, शिवर येथील पाच, रंगारहट्टी बाळापूर येथील चार, तर गायत्रीनगर, गुलजारपुरा, चावरे प्लॉट, जठारपेठ, रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन तर शंकरनगर, फिरदौस कॉलनी , मोहता मिल, गितानगर, हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, संत कबीर नगर, बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत ८२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ११०पॉझिटीव्ह- एकनिगेटीव्ह- १०९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ८२६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३५१ 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला