शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३४ रुग्ण वाढले, १९ जण बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:29 IST

जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१०१  झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ११७ वर पोहचला आहे. तर जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१०१  झाली आहे. दरम्यान, १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २३२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर शिवर, जिल्हा शल्य चिकत्कस कार्यालय, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सस्ती ता. पातुर येथील तीन जण तर बाजोरिया नगरी येथील एक जण पॉझिटिव्ह आढळू आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५१ वर्षीय पुरुषाचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या ५१ वर्षीय पुरुषाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. ही व्यक्ती गंगानगर, बायपास भागातील असून, त्यांना ९ आॅगस्ट रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाचा सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली१९ जणांना डिस्चार्जमंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर येथून चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, तर आॅयकॉन हॉस्पीटल येथून पाच अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.५४० जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या