शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, २० जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:40 IST

बुधवार, ०१ जुलै रोजी पातूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण बाधितांची संख्या १५६८ झाली आहे. मृतांचा आकडा ८० वर गेला आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची व मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ०१ जुलै रोजी पातूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ८० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १५६८ झाली आहे. दरम्यान, आणखी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी २१२ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.सकाळी प्राप्त ११ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तीन महिला व आठ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा अकोला, तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला असून अन्य सहा पुरुष आहेत. त्यातले तिघे डाबकी रोड येथील तर अन्य जुने शहर, पोळा चौक, मोठी उमरी, रजपुत पुरा येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.पातूर येथील एकाचा मृत्यूपातुर येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण २४ जून रोजी दाखल झाला होता.आणखी २० जणांना डिस्चार्जदरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर मधून १० अशा २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या १० जणांपैकी दोन जण अशोक नगर, दोन जण गुलजार पुरा येथील तर उर्वरित बाळापूर, लहान उमरी, खदान, धोबी खदान, इंदिरा नगर, रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर १० जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात पाच जण अकोट फैल येथील , दोन जण पातूर येथील तर उर्वरीत गितानगर, गंगानगर व गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाPaturपातूर