शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ५७ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ८१३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 19:54 IST

रविवार, ७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाचा मृत्यू, तर ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देव्हीआरडीएल लॅबकडून एकूण १७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले.यापैकी ५७ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ११९ निगेटिव्ह आहेत. रजपुतपुरा भागातील एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.

अकोला : अकोला जिल्हा व शहरात कोरोना साथीचे थैमान थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाचा मृत्यू, तर ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे मृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडाही ८१३ वर गेला आहे.मे महिन्यापासून रुग्णवाढीच्या सत्राने वेग घेतला असून, महिनाभराच्या कालावधीत अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास आला. शनिवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५६ होती. यामध्ये रविवारी ५७ रुग्णांची भर पडत हा आकडा ८१३ वर गेला. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ११९ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत. यामध्ये आठ जण खदान येथील, चार जण अकोट फैल, चार जण तार फैल, चार जण खडकी, चार जण जीएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंत्री मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फैल, गायत्री नगर कौलखेड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोर आणि नायगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील चार जण खदान येथील, तीन जण जठार पेठ येथील तर उर्वरित गोरक्षण रोड, कच्ची खोली सिंधी कॅम्प, अनिकट पोलीस लाईन, गवळीपुरा, दीपक चौक, शिवर, बलोदे ले आऊट, चैतन्य नगर, नायगाव, संत कबीर नगर, गुलजार पुरा आणि बाळापूर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

रजपुतपुरा भागातील एकाचा मृत्यूदरम्यान, शनिवारी एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून , त्याला ३१ मे रोजी दाखल केले होते. या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३७ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे.

आणखी नऊ जणांना डिस्चार्जसायंकाळी नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातले पाच जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला तर दोन पुरुष आहेर. त्यातील   देशमुख फैल येथील तीन जण तर  गायत्रीनगर, कमला नगर, देवी खदान,  सिटी कोतवाली जवळ,  सोनटक्के प्लॉट व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. आतापर्यंत ५४० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २३६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त अहवाल-१७६पॉझिटीव्ह-५७निगेटीव्ह-११९

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८१३मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५४०दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२३६

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला