शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू, १० पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:18 IST

शुक्रवार, ११ जुलै रोजी बाळापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला.

अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी बाळापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरानाच्या बळींचा आकडा ९२ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८५९ झाली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी ३५५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये दोन महिला व आठ पुरुष आहेत. यापैकी सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील, तर उर्वरित खडकी-अकोला व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज सायंकाळी एकही पॉझिटीव्ह अहवाल आलेला नाही.

एका महिलेचा मृत्यूदरम्यान एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ६७ वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला बाळापूर येथील रहिवासी असून दि.३ रोजी दाखल झाली होती.१४ जणांना डिस्चार्जदरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन तर कोविड केअर सेंटर मधून १२ अशा १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यात तिघे गंगा नगर येथील, मोठी उमरी, छोटी उमरी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित अकोट, घुसर व बाशीर्टाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या दोन जणांपैकी पोळा चौक व बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.३०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १८५९ (१८३८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९२ जण (एक आत्महत्या व ९१ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४६४ आहे. तर सद्यस्थितीत ३०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या