शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ‘कोरोना’ वॉर्डात ड्युटी म्हणून शेजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 10:43 IST

शेजारी त्यांच्यापासून दूर पळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवा करून घरी परतले की, काहींचे शेजारी त्यांना पाहूनच घरात जातात. डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना हा अनुभव रोजच येत आहे.अशी वागणूक कितपत योग्य आहे, याचं मंथन करण्याची गरज आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘कोरोना’चं नाव ऐकताच अंगावर शहारे येतात; पण याच जीवघेण्याविषाणूपासून रुग्णांच्या बचावासाठी वैद्यकीय क्षेत्रातील हजारो कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करण्याऐवजी शेजारी त्यांच्यापासून दूर पळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे सध्या वैद्यकीय सेवा देणाºया सहकार्यांचे मनोबल उच्चावण्याची गरज आहे.भारतीय संस्कृतीमध्ये शेजार धर्माला खूप महत्त्व आहे. अडचणीच्या काळात नातेवाइकांपेक्षा शेजारीच धावून येतात, हे खरं असलं, तरी ‘कोरोना’मुळे शेजार धर्माची व्याख्याच बदलल्याचा अनुभव अकोल्यातील काही डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आला आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय सेवेत त्यातही कोरोना कक्षात सेवा देणाºया डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना हा अनुभव रोजच येत आहे. येथील कोरोना समुपदेशन कक्ष तसेच आयसोलेशन कक्षात कार्यरत डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवा करून घरी परतले की, काहींचे शेजारी त्यांना पाहूनच घरात जातात. तर काहींच्या कुटुंबीयांसोबत शेजाºयांनी बोलणंदेखील बंद केल्याचा अनुभव काही वैद्यकीय कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणाºया या देवदूतांना मिळणारी अशी वागणूक कितपत योग्य आहे, याचं मंथन करण्याची गरज आहे.

खबरदारी हवी; पण प्रोत्साहनदेखील आवश्यक!‘कोरोना’ कक्षात रुग्णसेवा देत असताना येथे कार्यरत वैद्यकीय कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण त्यासाठी हे कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत आहेत. ते घरी परतल्यावर त्यांच्यासोबत शेजाºयांचा संपर्क येत असेल तर आवश्यक खबरदारी घ्या; मात्र त्यांना प्रोत्साहनदेखील द्या.

काय आहे वैद्यकीय कर्मचाºयांचा अनुभव?

  1. घरी पोहोचताच शेजारील लोक बोलणे टाळतात.
  2. बघताच मास्क लावतात. नाकाला रुमाल लावतात.
  3. शेजारच्या मुलांना त्यांच्या मुलांसोबत खेळू देण्यासही टाळतात.
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस