शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : मृत्युदर वाढताच; रुग्ण ‘व्हेंटिलेटर’च्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:18 IST

रुग्णाला व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, सोमवारी आणखी एका रुग्णाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे मागणी करूनही प्रशासनाकडून सर्वोपचार रुग्णालयात इतर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.सध्या जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; मात्र सद्यस्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

२४ व्हेंटिलेटरचा प्रस्ताव; मिळाले केवळ चारच!

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८२१ वर पोहोचली, तरी अद्याप केवळ चारच व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित २० व्हेंटिलेटर अद्यापही मिळाले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन तास ‘व्हेंटिलेटर’च्या प्रतीक्षा; प्राणज्योत मालवली!दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेला कारोनाची लक्षणे नव्हती मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्या महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता; पण आयसीयूमध्ये बेड उपलब्ध झाला नाही. तर दुसरीकडे ती महिला रुग्ण मृत्यूशी झुंज देत होती. जवळपास तीन तास सुरू असलेल्या जीवनमृत्यूच्या या संघर्षात व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिला जीव गमवावा लागला. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधनांचा अभाव असल्याने डॉक्टरही हतबल दिसून आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय