शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola: आठवडाभरात घसरला रुग्णवाढीचा ग्राफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:23 IST

CoronaVirus in Akola: बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना अकोलेकरांसाठी घातक ठरला होता; पण गत आठवडाभरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे, तर दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी बेफिकिरी घातक ठरू शकते.सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी ३०० पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये दिवसाला शंभरपेक्षा जास्त व्यक्तींचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघत होते. त्यामुळे महिनाभरात ३ हजारापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.मागील सहा महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवालांची नोंद करण्यात आली; मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवालांमध्ये कमालीची घट होण्यास सुरुवात झाली.पॉझिटिव्ह अहवालाची संख्या शंभरवरून घसरून ५० च्या खाली आली. शिवाय, रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्येही पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. असे असले तरी थोडीही बेफिकरी घातक ठरू शकते.आठ दिवसात १,१३७ रुग्ण बरे!जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६ हजार ५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यापैकी १ हजार १३७ रुग्णांना मागील आठ दिवसात सुटी देण्यात आली. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ८३२ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या