शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola: कोरोना रुग्णांचा आलेख चढताच; आणखी चार पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण २६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:07 IST

एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६१ वर गेली आहे.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी आणखी चौघांची भर पडली. १०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १०४ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आहेत.

अकोला : शहरातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून, सोमवार, १८ मे रोजी यामध्ये आणखी चार नव्या रुग्णांची भर पडली. सोमवारी आणखी चार जणांचे कोरोना संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६१ वर गेली आहे. आतापर्यंत ११७ जणांना रुग्णालयातून सुटी, तर १८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्या १२६ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून, दररोज यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. रविवार एकाच दिवशी तब्बल ३७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २५७ झाली होती. यामध्ये सोमवारी सकाळी आणखी चौघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी १०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १०४ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण फिरदौस कॉलनी, सुभाष चौक-रामदासपेठ, मोमीनपुरा-ताजनापेठ व सावंतवाड- रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. अकोला शहरात नवनविन प्रभागांमध्ये रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १७ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता १२६ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- २६१मयत-१८(१७+१),डिस्चार्ज- ११७दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १२६आज प्राप्त अहवाल-१०८पॉझिटीव्ह-चारनिगेटीव्ह-१०४

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या