शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात चार पॉझिटिव्ह; चौघांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:17 IST

आज राधाकिसन प्लॉट भागातील चार जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देसोमवारी दिवसभरात आणखी चौघांची भर पडली.आज चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले.एक रुग्ण दि.७ तर अन्य तिघे दि.८ रोजी दाखल झाले होते.

अकोला : अकोल्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड वेग घेतलेल्या कोरोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, कोरोनाची बाधा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सोमवार, १८ मे रोजी दिवसभरात चार नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १६१ वर पोहचली आहे. दरम्यान, आज राधाकिसन प्लॉट भागातील चार जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज सायंकाळी कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही. आतापर्यंत १२१ जणांना रुग्णालयातून सुटी, तर १८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्या १२२ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून, दररोज यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. रविवार एकाच दिवशी तब्बल ३७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २५७ झाली होती. यामध्ये सोमवारी दिवसभरात आणखी चौघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २६१६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २५२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २२६१ अहवाल निगेटीव्ह तर २६१ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ९४ अहवाल प्रलंबित आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी १०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १०४ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण फिरदौस कॉलनी, सुभाष चौक-रामदासपेठ, मोमीनपुरा-ताजनापेठ व सावंतवाड- रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. अकोला शहरात नवनविन प्रभागांमध्ये रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, आज चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हे चारही रुग्ण राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. यातील एक रुग्ण दि.७ तर अन्य तिघे दि.८ रोजी दाखल झाले होते. त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.१२१ कोरोनामुक्तआता सद्यस्थितीत २६१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. सोमवार १८ मे रोजी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.दरम्यान आजअखेर २५७४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १४५७ गृहअलगीकरणात तर ५७ जण संस्थागत अलगीकरणात असे १५१४ जण अलगीकरणात आहेत. तर ९२४ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला