शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  आणखी चार संशयित दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 10:36 IST

चार संशयित रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल.

ठळक मुद्दे आयसोलेशन कक्षात बुधवारपर्यंत कोरोनाचे पाच संशयित रुग्ण दाखल होते. दोघांचे बुधवारी रात्री, तर दोघाचे गुरूवारी वैद्यकीय चाचणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर लगेच चार नवे संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आतापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला, तरी दररोज संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आणखी चार संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले असून, सद्यस्थितीत सात रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. तर चार संशयित रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल.सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात बुधवारपर्यंत कोरोनाचे पाच संशयित रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघांचे बुधवारी रात्री, तर दोघाचे गुरूवारी वैद्यकीय चाचणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर लगेच चार नवे संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाले. या चौघांचे वैद्यकीय अहवाल चाचणीसाठी शुक्रवारी सकाळीच पाठविण्यात येणार आहेत, तर तिघांच्या वैद्यकीय चाचणीचे अलवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या तरी आयसोलेशन कक्षात कोरोनाचे सात संशयित रुग्ण दाखल आहेत. चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल. शिवाय, आणखी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली असून, त्याचा वैद्यकीय अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता.कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अकोलेकरांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १९ ‘निगेटिव्ह’कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या २६ रुग्णांपैकी १९ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटीव्ह नसल्याने अकोलेकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे; परंतु आणखी सात जणांचे अहवाल प्रलंबित असून, संकट टळले नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला