शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दोन दिवसात चौघांचा मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:25 IST

मागील दोन दिवसात आणखी चौघांचा मृत्यू झाला.

अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, गत दोन दिवसांत आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा १३५ वर पोहोचला आहे. तर गत दोन दिवसात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णवाढ आणि मृत्यूच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.मागील दोन दिवसात आणखी चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ५५ वर्षीय पुरुष रुग्ण मूर्तिजापूर येथील रहिवासी असून, तो ९ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तर दुसरा ६४ वर्षीय रुग्ण हा न्यू राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असून, तो ५ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तसेच वाल्मीक नगर, अकोट येथील ६० वर्षीय रुग्णाचाही शनिवारी मृत्यू झाला. हा रुग्ण १४ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तर चौथा मृत्यू जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा झाला. तो १० आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. शनिवारी प्राप्त १८ पॉझिटिव्ह अहवालामध्ये पाच महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील दहीगाव गावंडे येथील तीन जण, शिवणी, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जोगेश्वर प्लॉट, हिंगणा रोड अकोला, नानक नगर निमवाडी, देशमुख फैल, अकोट, तेल्हारा व हिवरखेड तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. रविवारी सकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सहा महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण मूर्तिजापूर येथील, तर दोन जण बार्शीटाकळी येथील रहिवासी आहेत. उर्वरित वाडेगाव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमध्ये बार्शीटाकळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.१६ दिवसांत ३० मृत्यूची नोंदजिल्ह्यात जून व जुलै महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र आॅगस्ट महिन्यातील गत १६ दिवसात तब्बल ३० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गत चार महिन्यांच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या