शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : पाच मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, १२ जणांना ‘डिस्चार्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:37 IST

अकोल्यात एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे.सद्यस्थितीत ३१९ जणांवर उपचार सुरु.सायंकाळी प्राप्त सातही अहवाल निगेटिव्ह.

अकोला : अकोल्यात रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. दरम्यान, दुपारी आणखी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३१९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जाहीर केले.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ होता. रविवारी यामध्ये तब्बल पाच जणांची भर पडत हा आकडा ५१ वर पोहचला आहे. रविवारी, अकोट फैल भागातील ६८ वर्षीय महिला, शंकर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला, बापूनगर येथील ५८ वर्षीय पुरुष व सिंधी कॅम्प येथील ५६ वर्षीय पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सिंधी कॅम्प येथील मृत रुग्ण हा खासगी इस्पितळात उपचार घेत होता. तेथे शनिवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.२२ पॉझिटिव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण १००अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन, तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फैल, तार फैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी प्राप्त सातही अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.आणखी १२ जण झाले बरेदरम्यान, दुपारनंतर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील तिघांना घरी पाठवण्यात आले. तर उर्वरीत नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला व पाच पुरुष रुग्ण आहेत. त्यातील पाच जण तापडीया नगर येथील, दोन जण गुलजारपुरा येथील तर उर्वरीत अकोट फैल, तार फैल, सिंधी कॅम्प, शिवाजीनगर, खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.प्राप्त अहवाल-१००पॉझिटीव्ह-२२(२१+१)निगेटीव्ह-७८आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७मयत-५१(५०+१),डिस्चार्ज-६३७दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३१९

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या