शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 CoronaVirus: अकोला ‘हर्ड इम्युनिटी’पासून दूरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 10:50 IST

CoronaVirus, Herd immunity, Serological Survey कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील १५.१६ टक्के लोक संक्रमितजिल्ह्यात ‘सेरो’ सर्वेक्षण करण्यात आले.

अकोला : ‘सेरो’ सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील २० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच केवळ दोन लाख लोकसंख्या कोरोनामुळे संक्रमीत झाली आहे. त्यामुळे सध्यातरी अकोलेकर ‘हर्ड इम्युनिटी’पासून दूरच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.विदर्भात नागपूरसह अकोल्यात जून, जुलै महिन्यात कोरोनाने कहर केला होता, तर सप्टेंबर महिना आतापर्यंतचा सर्वाधिक घातक महिना ठरला. दरम्यानच्या काळात आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ‘सेरो’ सर्वेक्षण करण्यात आले. ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २,९७५ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. जिल्ह्यात किती लोकांना कोरोना होऊन गेला, याचा अंदाज यावा, या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ दोन लाख, ७५००२ व्यक्तींना कोरोना होऊन गेला. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या केवळ १५.१६ टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने अद्यापतरी अकोलेकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झालेली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अकोलेकरांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांकडून केले जात आहे.दुसऱ्या लाटेची शक्यता!मागील सहा महिन्यांत जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. मध्यंतरी कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ -उतार झाला, तर आॅक्टोबर महिन्याची सुरुवातही दिलासादायक झाली; मात्र आगामी सण, उत्सव अन् वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली ही अकोलेकरांसाठी चांगली बाब आहे; मात्र नागरिकांनी बेफिकीरी करून चालणार नाही. गर्दी करणे टाळा, मास्कचा वापर करा, नियमित साबणाने हात धुवा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी योग्य खबरदारी आवश्यक आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या