शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; नऊ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ७९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:17 IST

मंगळवार, ३० जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देआणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ७९ वर गेला आहे. एकूण रुग्ण संख्या १५४५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ३० जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ७९ वर गेला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १५४५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १९१ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. नऊ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. यापैकी दोघे जण बाळापूर येथील तर दोघे अकोट येथील आहेत. तसेच चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.दोघांचा सोमवारी रात्री मृत्यूकोरोनामुळे दगावणाºयांची संख्याही वाढत आहे. सोमवारी रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक अकोला शहरातील गंगानगर भागातील ७४ वर्षीय महिला असून, त्यांना १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक जण अकोट येथील ५६ वर्षीय पुरुष असून, त्यांना २७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचाही सोमवारी रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.३७३ रुग्णांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १०९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत ७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३७३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल-१९१पॉझिटीव्ह अहवाल-०९निगेटीव्ह-१८२

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५४५मयत-७९ (७८+१)डिस्चार्ज-१०९३दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७३

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या