शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; आठ नवे पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 18:13 IST

आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १८ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला, तर एकूण बाधितांची संख्या २,०६५ झाली आहे. दरम्यान, आणखी १५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारीदिवसभरात २२९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२१ निगेटिव्ह, तर आठ पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघेही पुरुष असून, यामध्ये बोरगाव मंजू येथील तीन, तर अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या चार अहवालांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तीन जण बोरगाव मंजू येथील, तर मुर्तीजापूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोट येथील दोघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही अकोट येथील असून, त्यापैकी एक जण ७६ वर्षीय, तर दुसरा ५४ वर्षीय आहे. या दोन्ही रुग्णांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.१५ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.२८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २०६५ असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या