शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; २९ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:32 IST

२९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्येचा आकडा ११९२ वर पोहोचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून मृतकांची संख्या चिंता वाढवित आहे. अशातच रविवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुसरीकडे २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्येचा आकडा ११९२ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एकाचा बळी जात असून आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा ६६ वर पोहोचला आहे. मृत्यूची वाढते प्रमाण चिंताजनक असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचेहे सत्र रविवारीही सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मृत्यू झालेल्यांमध्ये नायगांव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. ते ८ जून रोजी दाखल झाले होते. तसेच शेगांव जि. बुलडाणा येथील ५० वर्षीय महिला रुग्णांचा काल शनिवारी मृत्यू झाला असून ती १९ जून रोजी दाखल झाली होती. तर दुसरीकडे २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आला. सकाळी प्राप्त १५ पॉझिटिव्ह अहवालामध्ये पांच महिला व दहा पुरुष आहे. त्यात शंकरनगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे जवळ, लाडीजफाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. तर सायंकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालांमध्ये सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फाईल येथील प्रत्येकी दोन तसेच शेगांव जि. बुलडाणा, वाडेगांव, हरिहर पेठ, जूने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील सात अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ११९२ वर पोहोचली आहे. त्यातील ७६२ जणांना डिस्चार्ज दिला असून, सद्या ३६४ रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-११९२मृत्यू -६६(६५+१)डिस्चार्ज-७६२अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह -३६४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला