शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू; १५२ पॉझिटिव्ह, १५९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:56 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५ तर रॅपिड चाचण्यांमध्ये सात असे एकून १५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२८९ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५ तर रॅपिड चाचण्यांमध्ये सात असे एकून १५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२८९ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६६ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये पिंजर येथील सात, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा, नागे लेआऊट येथील पाच, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेडवा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील प्रत्येकी तीन, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन, आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिजार्पूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, योगी चौक, पारस, चान्नी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ६४ जणांमध्ये दहिगाव येथील नऊ, डाबकी रोड व गौरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा, कौलखेड, लहान उमरी व जूने शहर येथील चार, उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन, देशमुख फैल, सिसा ता. बार्शिटाकळी, खेमका सदन, गीतानगर, वाडेगाव, मोठी उमरी व राऊतवाडी येथील प्रत्येकी दोन, तोष्णीवाल लेआऊट, बालाजीनगर, महान, कळंबा, जीएमसी, दुगार्चौक, वडाळी देशमुख, जूना कपडा बाजार, माधव नगर, आळसी प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

जुने शहर व चिखलगावातील दोघांचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामध्ये चिखलगाव येथील ७५ वर्षीय पुरुष व अकोल्यातील जुने शहरातील पोळा चौक भागातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे ८ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी उपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

१५९ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ३५, उपजिल्हा रुग्णालयातून १०, आयकॉन हॉस्पीटल व ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून ४७, तर कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून १७ अशा एकूण १५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१०९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२८९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४०१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला