शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३८ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७०३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:25 IST

रविवार, ५ जुलै रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्दे३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८९ झाला आहे. एकूण रुग्ण संख्या १७०३ वर गेली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नावच घेत नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. रविवार, ५ जुलै रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८९ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १७०३ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी एकूण ११९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ३८ अहवालांमध्ये ११ महिला  व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील, सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट, पाच जण चांदुर, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण कच्ची खोली, तर उर्वरित राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव,पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७०३ झाली आहे. आतापर्यंत १२५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.सिंधी कॅम्पमधील एकाचा मृत्यूसिंधी कॅम्प येथील एका ८२ वर्षीय वृद्धाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीस २ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ८९ झाली आहे.प्राप्त अहवाल-११९पॉझिटीव्ह-३८निगेटीव्ह-८१आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७०३मयत-८९(८८+१)डिस्चार्ज १२५५दाखल रुग्ण( अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५९

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या