शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ‘एमआयडीसी’तून होऊ शकतो कोरोना उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:14 IST

एमआयडीसीतून केव्हाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही धोक्याची घंटा आहे, अशी शक्यता येथील उद्योजकांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीत दररोज ३०० ट्रक चालक आणि ३०० वाहक ये-जा करीत असतात.माल भराई आणि माल उतारण्यापर्यंत ही मंडळी याच परिसरात वावरते.केवळ कारखाना परिसरातच चालक-वाहक लोक मास्कचा वापर करतात.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची पाहिजे तशी खबरदारी घेतली जात नसल्याने अकोला एमआयडीसी कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. एमआयडीसीतून केव्हाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही धोक्याची घंटा आहे, अशी शक्यता येथील उद्योजकांनी वर्तविली आहे.माल वाहतुकीच्या निमित्ताने अकोला एमआयडीसीत दररोज ३०० ट्रक चालक आणि ३०० वाहक ये-जा करीत असतात. केवळ कारखाना परिसरातच चालक-वाहक लोक मास्कचा वापर करतात. इतर ठिकाणी त्यांचा मुक्त संचार असतो. एमआयडीसीत आल्यानंतर प्रत्येक ट्रक येथील धर्मकाट्यावर वजनमापासाठी जात असतो. त्यानंतर माल भराई आणि माल उतारण्यापर्यंत ही मंडळी याच परिसरात वावरते. जेवण आणि इतर दिनचर्येसाठी ही मंडळी बराच वेळ या परिसरात वावरत असते. राज्यातील आणि राज्याबाहेरील बाधित परिसरातून ही मंडळी दररोज अकोल्यात येते.अकोल्यात आल्यानंतर या लोकांची किमान प्राथमिक आरोग्य तपासणी व्हायला हवी; मात्र तीदेखील होत नाही. दिवसभर अकोल्यात वावरून ही मंडळी पुन्हा त्यांच्या गावाकडे रवाना होत आहेत. एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळच चेकपोस्ट तयार करून या चालक-वाहकांची आरोग्य तपासणी व्हायला हवी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.कामगारांची पायपीटलॉकडाउनच्या कार्यकाळात एमआयडीसीत सेवा देणाऱ्या कामगारांना येण्या-जाण्यासाठी कोणतेही वाहन नाही. यासाठी महापालिकेने त्यांच्या बंद पडलेल्या बसेस जर एमआयडीसीला भाडेतत्त्वावर दिल्या आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ची नियमावली आखून दिली तर अनेक समस्या सुटू शकतात.अग्रवाल वजनकाट्याजवळचा दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट चेकपोस्टसाठी द्यायची तयारी आहे. इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा अकोला एमआयडीसी कोरोनाचा हॉटस्पॉट होईल.-विनीत बियाणी,अध्यक्ष, महाराष्ट्र सोप अ‍ॅण्ड डिटर्जन्ट असोसिएशन,अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळcorona virusकोरोना वायरस बातम्या