शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Akola : ‘कोरोना’चे गांभीर्य नाहीच; अकोलेकर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 10:51 IST

काहीही गरज नसताना मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अकोलेकर फिरताना आढळून आले.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचे अकोलेकरांना गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे.सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित. गल्लीबोळात तरुणांचे घोळके चर्चा करीत असताना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचा निर्णय लागू केला होता. तरीही नागरिक रस्त्यांवर गर्दी करीत असल्याचे पाहून एक पाऊल पुढे जात संचारबंदी लागू केली. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी पुढील २१ दिवसांकरिता संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. अवघ्या तिसऱ्याच दिवशी (गुरुवारी) काहीही गरज नसताना मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अकोलेकर फिरताना आढळून आले. ही बाब पाहता झपाट्याने प्रसार होणाºया कोरोना विषाणूचे अकोलेकरांना गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे.जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाला असून, सर्वाधिक संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. धोक्याची घंटा लक्षात घेता, या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून विविध निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी गर्दी टाळणे, हा यावरचा ठोस प्रतिबंधात्मक उपाय असल्याने जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सातत्याने आवाहन केले जात आहे. संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेद्वारा, जनतेसाठी व स्वत:साठी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला. यादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली होती. तरीही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी व समाज रक्षणासाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असताना दुर्दैवाने तसे होत नसल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.

गल्लीबोळात तरुणांचे घोळकेदेश संकटातून मार्गाक्रमण करीत आहे. केंद्र व राज्य शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार एकत्र न येण्याचे नागरिकांना आवाहन केले जात असताना गल्लीबोळात तरुणांचे घोळके चर्चा करीत असताना दिसून आले. स्वत:सोबतच कुटुंबीयांचा व शेजाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस