शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; बाळापूरातील महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:04 IST

बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्दे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ६७ वर गेला आहे.एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४४ आहे.४१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, बाधितांचा व मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २३ जून रोजी बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अकोला शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ६७ वर गेला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४४ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी एकूण ७६ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोल्यातील दगडी पूल भागातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.दरम्यान, बाळापूर शहरातील एका ५० वर्षीय महिलेचा मंगळवारी पहाटे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदर महिलेला १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे आतापर्यंत एकूण ६७ मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, आतापर्यंत ७६५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, आता ४१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ७६पॉझिटीव्ह- एकनिगेटीव्ह- ७५

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ७६५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२ 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाBalapurबाळापूर