शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Akola : आणखी एकाचा बळी; ६६ नवे कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:12 IST

कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,५७६ वर पोहोचला असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०४ वर पोहोचली आहे.

अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे, तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३४ अहवाल ‘व्हीआरडीएल’ लॅबमधील, तर २९ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टच्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,५७६ वर पोहोचला असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०४ वर पोहोचली आहे.कोरोनाने धुमाकूळ घातला असून, मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी रात्री आणखी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील रहिवासी होता. तो २० जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. आतापर्यंत कोरोनामुळे १०५ जणांचा बळी गेला. तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून गुरुवारी सकाळी प्राप्त २८४ अहवालापैकी ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी सकाळी प्राप्त ३४ पॉझिटिव्ह अहवालामध्ये १८ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील मोठी उमरी येथील सात जण, वानखडे नगर व कोठारी येथील प्रत्येक पाच, उगवा व वाडेगाव प्रत्येकी तीन, तेल्हारा, हिवरखेड व भीम नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित राणेगाव तेल्हारा, बाळापूर, शिवसेना वसाहत, रेणुका नगर व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष असून, ते कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील रहिवासी आहेत.

१६ जणांना डिस्चार्जगुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, तसेच कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच हॉटेलमधून दोघांना, अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.९११ अहवाल निगेटिव्हजिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे; मात्र गुरुवारी प्राप्त आरटीपीसीआर आणि रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टच्या एकूण ९७७ अहवालापैकी ९११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामध्ये ३५८ आटीपीसीआर, तर ५५८ रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टच्या अहवालांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला