शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ४३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ४० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:28 IST

मंगळवार, ९ जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदिवसभरात ४३ नव्या रुग्णांची भर पडली.एकूण बाधितांची संख्या ८६४ झाली आहे.कोरोनाबाधितांच्या बळींचा एकूण आकडा ४० वर गेला आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ९ जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोनाबाधितांच्या बळींचा एकूण आकडा ४० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ८६४ झाली आहे. तथापी, आतापर्यंत ५४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्या २७९ जणांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. सोमवार, ८ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८२१ होता. त्यामध्ये मंगळवारी दिवसभरात ४३ जणांची भर पडत हा आकडा ८६४ वर पोहचला आहे. मंगळवारी दुपारी गुलशन कॉलनी परिसरातील ७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सदर रुग्णास २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण २५५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ पॉझिटिव्ह, तर उर्वरित २१२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये जुने शहर भागातील दोन, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त ३२ पॉझिटीव्ह अहवालात १४ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात पाच जण हैदरपुरा येथील, चार जण न्यू तापडिया नगर, चार जण खदान नाका, दोन जण खडकी येथील, तर दोन जण आदर्श कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर उर्वरीत सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तार फैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस क्वार्टर रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास,कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोकनगर, फिरदौस कॉलनी, हांडे प्लॉट, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.प्राप्त अहवाल-२५५पॉझिटीव्ह-४३निगेटीव्ह-२१२आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८६४मयत-४०(३९+१),डिस्चार्ज-५४५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२७९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला