शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:55 IST

मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देअकोला शहरातील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा ९० झाला असून, एकूण बाधितांची संख्या १७७९ वर पोहचली आहे.

अकोला : अकोल्याला बसलेला कोरोनाचा विळखा सैल होण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर अकोला शहरातील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा ९० झाला असून, एकूण बाधितांची संख्या १७७९ वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवारी४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात एकूण १३४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ११८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ७ महिला तर ९ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये कच्ची खोली येथील ५, अकोट येथील तीन, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी एकाही संदिग्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.पातूरच्या रॅपीड टेस्ट मध्ये २१ पॉझिटिव्हपातूर येथे ५ व ६ जुलै रोजी रॅपीड टेस्ट मोहिम राबविण्यात आली. या दोन दिवसांत पातूर येथील २१ जण पॉझिटीव्ह आले आहेत. ही रुग्ण संख्या मंगळवारच्याअहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.

५२ वर्षीय महिला दगावलीदरम्यान, खैर महम्मद प्लॉट येथील ५२ वर्षीय महिलेचा मंगळवारी उपचार घेताना मृत्यू झाला. त्यांना २७ जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

४७ जणांना डिस्चार्जआज दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सकाळी दोघे व दुपारनंतर पाच जणांना अशा सात जणांना तर ४० जणांना कोविड केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या सात जणांपैकी सिंधी कॅम्प येथिल तीन जण, अकोट, गाडगे नगर, हनुमान नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथून घरी सोडण्यात आलेल्या ४० जणांपैकी तारफैल येथील दहा जण, छोटी उमरी, कळंबेश्वर व अकोट येथील प्रत्येकी पाच जण, गजानन नगर येथील चार जण पिंपळखुटा आणि जुने शहर येथील प्रत्येकी दोन जण, मळसुळ, अयोध्या नगर, खदान, गाडगेनगर, कामा प्लॉट, बोरगाव मंजू आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

३५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १७७९ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९० जण (एक आत्महत्या व ८९ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३३३ आहे. तर सद्यस्थितीत ३५६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला