अकोला : अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची मालिका सुरुच असून, सोमवार, ४ मे रोजी यामध्ये आणखी ९ रुग्णांची भर पडली. आज प्राप्त एकून ८१ अहवालांपैकी ९ जणांचे पॉझिटिव्ह, तर ७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४४ तर एकून कोरोनाबाधितांची संख्या ६४ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सकाळी देण्यात आलीदरम्यान, सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी पाच जण हे कृषीनगर भागातील आहेत. तर उर्वरित चौघे हे कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा आणि बाळापूर तालुक्यातील अंत्री या गावातील असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.आज सोमवार दि.४ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालआज प्राप्त अहवाल- ८१पॉझिटीव्ह-नऊनिगेटीव्ह- ७२
CoronaVirus in Akola : आणखी ९ पॉझिटिव्ह; अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:28 IST