शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात ८ नवे पॉझिटिव्ह; आणखी दोघे कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:21 IST

सकाळी सहा, तर सायंकाळी २ असे एकून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

ठळक मुद्देआज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५८ अहवाल प्राप्त झाले.त्यातील ५० अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी (दि.१) दाखल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

अकोला : बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने अकोल्यात झपाट्याने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, शनिवार, २ मे रोजी दिवसभरात ८ नव्या रुग्णांची भर पडली. सकाळी सहा, तर सायंकाळी २ असे एकून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४० झाली असून, प्रत्यक्षात २४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५० अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.१) दाखल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे. दि. २८ रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खाजगी रुग्णालयात गेली होती. तर सायंकाळी अहवाल आलेले रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे आणि ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत, त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरु आहे.

२४ जण उपचार घेत आहेत

आता सद्यस्थितीत  ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पाच जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २४ जण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला