शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Akola : दिवसभरात ६९ पॉझिटिव्ह; १८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:06 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ व रॅपिड चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६९ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ व रॅपिड चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ ,५४४ वर गेली आहे. दरम्यान, १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जण पॉझिटिव्ह असून, १५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.यामध्ये यामध्ये एकट्या तेल्हारा शहरातील १३ व चांगेफळ येथील १० जणांसह, बाळापूर येथील सात जण, म्हैसपूर येथील चार जण, बोरगाव मंजू येथील दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोला शहरातील जवाहरनगर, चांदूर, कान्हेरी गवळी, डाबकी रोड, कावसा, देशमुख फैल, गोरेगाव, पोपटखेड व जूने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचाही समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.रॅपिड चाचण्यांमध्ये २४ पॉझिटिव्हसोमवारी दिवसभरात झालेल्या १६५ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यामध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात १५, आयएमएच्या कॅम्पमध्ये सात, अकोट व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक असे एकूण १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११५६७ चाचण्यांमध्ये ६१४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.१८ जणांना डिस्चार्जसोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर येथून दोन जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर बाशीर्टाकळी येथून दोन जणांना अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३७८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३५४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०२२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या