शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 CoronaVirus in Akola :  ४६ नवे पॉझिटिव्ह; २३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:25 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८ , तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १८ असे एकूण ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २९ जुलै रोजी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८ , तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १८ असे एकूण ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०४ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २५४२ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २५४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित २२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळीे नऊ महिला व १० पुरुषांसह १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये अकोट येथील १५ जणांसह अकोला शहरातील दगडीपूल, बाभूळळगाव, पांढरी व तेल्हारा तालुक्यातील राणेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी एक महिला व आठ पुरुषांसह नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव येथील दोन जण, तर बोंदरखेड, गोलबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मुर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.हिवरखेड येथील महिलेचा मृत्यूदरम्यान, बुधवारी आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. ही ६० वर्षीय महिला तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील असून, त्यांना १५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.२३ जणांना डिस्चार्जबुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४ जण, ओझोन हॉस्पीटल व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी दोन तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३८४ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५४२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या