शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola  : दिवसभरात ४३ पॉझिटिव्ह; २७ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:16 IST

२२ आॅगस्ट रोजी दिवसभरात ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४४१ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २२ आॅगस्ट रोजी दिवसभरात ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४४१ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ५३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल ४८८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३० जणांमध्ये १९ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तीजापूर येथील ३३ जणांसह, अकोट तालुक्याती सावरा येथील पाच, खांबोरा येथील दोन, तर डाबकी रोड येथील एक, तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव व इसापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.२७ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८ जणांना, हॉटेल रणजित येथून दोन जणांना, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून एक जण, कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला