शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ४०५ चाचण्या; १७ जण पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:12 IST

यामध्ये १४ पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर, तर ३ रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचे आहेत.

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. गुरुवारी दिवसभरात ४०५ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये १४ पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर, तर ३ रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचे आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत २० दिवसांत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. गुरुवारी आरटीपीसीआर आणि रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट मिळून ४०५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या १४ रुग्णांमध्ये सिव्हिल लाइन येथील दोन जण तर उर्वरित बाळापूर नाका, जीएमसी क्वॉटर व सस्ती ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित हरिहर पेठ, तोष्णीवाल लेआउट, चांगेफळ अकोला, तेल्हारा, बाभूळगाव ता. पातूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, पोपटखेड ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३,३५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यापैकी २,८८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

६३ रुग्णांना डिस्चार्जरुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण लक्षणीय आहे. गुरुवारी ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २६ जणांना, कोविड केअर सेंटर येथून २० जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून ११ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन जण, हॉटेल रणजित येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक, असे एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या