शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३९ पॉझिटिव्ह; २८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:29 IST

कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७४२ वर गेली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारा लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७४२ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी एकूण ३७४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळच्या अहवालात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. ते बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला(१३ महिन्यांच्या बालिकेसह) व तीन पुरुष आहेत (एक चार वर्षे व एक आठ वर्षीय बालकांसह) या रुग्णांपैकी चार जण गिता नगर येथील तर अन्य नानक नगर व कच्ची खोली येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत ,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.२८ जणांना डिस्चार्जदरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर येथून १८ अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या १० जणांपैकी चार जण हे सिंधी कॅम्प येथील, दोन जण ज्ञानेश्वर नगर, तर उर्वरीत आदर्श कॉलनी, शिवसेना वसाहत, बाळापूर व अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या १८ जणांपैकी आठ जण हरिहर पेठ येथील, सात जण बाळापूर येथील तर दोन जण पातूर व एक जण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे.३६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १७४२ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८९ जण (एक आत्महत्या व ८८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२८६ आहे. तर सद्यस्थितीत ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला